नागपूर – सेंट जॉन शाळेचा १० वीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षकाविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थ्याला उपचारासाठी जनता रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
अभ्यासात कमजोर असल्याने त्याला शिक्षकाकडून नेहमीच टार्गेट केले जात होते. पराग तोराने असे या शिक्षकाचे नांव आहे. यांनी मुलाला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे. त्याला शाळेतून काढण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यामुळे घरी आई वडील नसताना मुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बहिण घरी असल्याने तिने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.