चाळीसगाव – शहरातील काकासाहेब पुर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात शिक्षकाने विद्यार्थ्याला जमीनीवर आपटल्याने त्याच्या पायाला दुखापत झाल्याची घटना 11 रोजी 5 वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव रोडवरील रहीवासी तथा स्टँप वेंडर पराग पुरुषोत्तम कुळकर्णी (45) यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा मुलगा सर्वेश पराग कुलकर्णी 12 यास काकासाहेब पुर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सोनवणे यांनी विद्यालयात काही कारण नसताना जोरात जमीनीवर ओढुन आपटल्याने त्याच्या पायाला दुखापत होवुन फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी शिक्षकाविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार धर्मराज पाटील करीत आहेत.