शिक्षकाला अटक

0

पिंपरी-चिंचवड। शिकवणी वर्गाला आलेल्या 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही घटना 15 मार्चला दुपारी दोन ते चारच्या सुमारास संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली होती.

राजेश जोशी (वय 54, रा. संत तुकारामनगर, पिंपरी), असे अटक केलेल्या शिकवणी वर्गाच्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी राजेश हा संत तुकारामनगरात खासगी शिकवणी वर्ग घेत आहे. पिडीत मुलगी त्याच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून शिकवणी वर्गाला जात होती.