शिक्षकाला अटक

0

ठाणे : किसननगर येथील महापालिका शाळा क्रमांक एकच्या नववीच्या वर्गात शिकवताना मुलींशी अश्लील शेरेबाजी करीत त्यांचा विनयभंग करणार्‍या सुरेश मोरे (32) या शिक्षकाला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्याने वर्गातील तीन ते चार मुलींशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका मुलीने दाखल केली आहे.