शिक्षक अभियोग्यता परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर गर्दी

0

धुळे – शासनाने शिक्षक पात्रतेसाठी लागू केलेल्या शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा आज महाराष्ट्रात घेतली जात आहे. खान्देशातील तीनही जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर परिक्षार्थीची गर्दी दिसून आली. दरम्यान सकाळी 7.30 वाजता केंद्रावर रिपोरटिंग करणे अनिवार्य असल्यामुळे परीक्षार्थींना मोठी कसरत करावी लागली. कारण जिल्हाबदल परीक्षा केंद्र असल्यामुळे धुळे जिल्ह्याचे उमेदवार जळगाव केंद्रावर तर जळगावचे नंदुरबार केंद्रावर त्यामुळे परिक्षार्थींचे अतोनात हाल झाल्याचे दिसून आले. विवाहित महिला आपली मूले सोबत घेऊन परीक्षेला आलेली पाहायला मिळाली.