शिक्षक किरण पाटील यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

0

जळगाव । विश्‍वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साई प्रतिष्ठान, वडगावशेरी, पुणे यांच्यावतीने देण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार ’ 2017 साठी भगीरथ इंग्लिश स्कूलचे कृतीशिल शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रामदास फुटाणे, चित्रपट अभिनेते शशिकांत खानविलकर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार जगदिश मुळीक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांच्याहस्ते 30 एप्रिल रोजी प्रदान करण्यात येणार आहे. यांचे शिक्षकवृदांनी अभिनंदन केले आहे.