शिक्षक दिनानिमित्त मातोश्री फाऊंडेशन तर्फे विविध स्पर्धा परीक्षा पुस्तके विद्यार्थ्यांसाठी वाचनासाठी खुले
न्हावी प्रतिनिधी दि 6
आज शिक्षक दिनाचे निमित्ताने मातोश्री फाऊंडेशन पिंपरूड तर्फे UPSC, MPSC व विविध स्पर्धा परीक्षा पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी खुले करण्यात आले,छोटेखानी कार्यक्रमात मातोश्री फाऊंडेशन चे अध्यक्ष जनार्दन जंगले,उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले, कलाविष्कार ग्रुप फैजपूर चे संचालक व्हि ओ चौधरी, ज्येष्ठ पत्रकार संजय सराफ, रिपब्लिकन पक्ष (आठवले) जिल्हा उपाध्यक्ष गौतम सुरवाडे, सुनिल जंगले, मातोश्री फाऊंडेशन चे व्यवस्थापक पुष्पक पाटील व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते, सर्व विद्यार्थ्यांना पुष्पक पाटील हे मातोश्री फाऊंडेशन पिंपरूड गट क्र ४३९ फैजपूर रोड येथे रोज सकाळी साडे आठ ते अकरा वाजेपर्यंत (रविवार सोडून) पुस्तके देण्यासाठी उपलब्ध असतील, तरी लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री फाउंडेशन तर्फे करण्यात येत आहे*