शेंदुर्णी । येथील गरुड महाविद्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालक शिक्षक संघाचे सहसचिव अनिल छबिलाल गुजर होते. सुरुवातीला भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्तविकात शाळेचे मुख्याध्यापक बी.जी.मांडवडे यांनी आज शिक्षण प्रक्रियेतील शिक्षकांची भुमिका बदलली आहे. शिकवतो तो नव्हे तर शिक्षकायला प्रेरित करतो, कसे शिकावे हे जो शिकवतो तो खरा शिक्षक आहे. शिक्षक हा समाज घडणीचा आधारस्तंभ आहे. काळ कितीही बदलला माध्यम कितीही प्रगत झाली तरी विद्यार्थ्यांच्या जिवनातील शिक्षकांचे स्थान धृ्रवतार्याप्रमाणे अढळ राहणार असल्याचे सांगितले.
विद्यार्थी झाले शिक्षक
महाविद्यालयातील विज्ञान विभागाचे विद्यार्थी यांनी शिक्षक दिनी शाळा चालवली यामध्ये 11 वी व 12 वी विज्ञान विभागाचे विद्यार्थी यांनी सकाळपासून मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिपाईंपर्यंत विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळेचे शिकवायचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले. प्रत्येक विषयाच्या तासिका, हजेरी व मधल्या सुटीतील खिचडिचे नियोजन केले. मुख्याध्यापक बी.जी.मांडवडे, उपमुख्यध्यापक डी.आर.शिंपी, पर्यवेक्षक एस.एस.जैन व शिक्षकांनी कौतुक केले.
आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
आदर्श शिक्षक म्हणून इयत्ता 5 ते 7 वी विभागातून श्रीमती टी.जी.पाटील, इयत्ता 8 ते 10 वी विभागातून पी.के.चौधरी व विज्ञान विभागातून श्रीमती एस.ए.पवार यांनी पुरस्कार देण्यात आले. विद्यार्थी मनोगतात मनोज जाधव, कु. सुचिता परदेशी, हितेश पाटील, कु. वृषाली नवलकर, कु. संस्कृती उपाध्यय, गायत्री उशिर, सृष्टी पाटील, आकांक्षा बारी, खुशी काबरा, निशा जाधव, रोहण शेलाड, ज्ञानेश्वर राठोड यांनी विचार मांडले. शिक्षक मनोगतात पर्यवेक्षक एस.एस.जैन यांनी आई व वडिल हे आपले प्रथम गुरु आहे असे सांगितले आदर्श शिक्षक मनोगत पी.के.चौधरी व आदर्श शिक्षिका श्रीमती एस.ए.पवार यांनी सुद्धा विचार मांडले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे पं.स.सदस्य शांताराम गुजर पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक बी.जी.मांडवडे, उपमुख्याध्यापक डी.आर.शिंपी. पा.शि.संघाचे सचिव एस.बी. पाटील, सहसचिव अनिल गुजर व भावना राकेश जैन, जयश्री पाटील, शितल काबरा तसेच दोघ विभागाचे शिक्षक बंधु भगिणी व किमान कौशल्य विभागाचे सी.पी. पाटील आभाराचे काम उपमुख्याध्यापक डी.आर.शिंपी यांनी मानले.