शिक्षक दिन साजरा

0

जुन्नर । निमगाव सावा येथील दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त एक दिवस विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले, अशी माहिती प्राचार्य प्रल्हाद शिंदे व अनिल पडवळ यांनी दिली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा अध्ययनाचा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी कार्यालयीन कामकाजा बरोबरच प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, लेखनिक, शिपाई अशा भूमिका समर्थपणे पार पाडल्या. प्रियंका तट्टू, रितेश भिसे, तान्हाजी कदम, अक्षदा गाडगे, ऋतुजा शिंदे, सचिन राक्षे, शुभांगी शेलार, आरती शिंदे आदी विद्यार्थ्यांनी या अध्ययनामध्ये सहभाग घेतला. प्रास्तविक उत्कर्षा मते हिने केले. सूत्रसंचालन निखिल डुकरे याने केले. तर कोमल गाडगे हिने आभार मानले.