शिक्षक- पदवीधरमध्ये सरासरी 70 टक्के मतदान

0

मुंबई । विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात शुक्रवारी एकूण पाच जागांसाठी मतदान झाले. या निवडणूक रिंगणात 76 उमेदवारांचे भवितव्य 5,97,986 मतदरांच्या हाती होते. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दोनपर्यंत अमरावती पदवीधर मतदार संघात 40.46 टक्के, नाशिक पदवीधर मध्ये 38.29 टक्के, नागपूर शिक्षक 55.82 टक्के, औरंगाबाद शिक्षक 56.08 टक्के, कोकण शिक्षक 66.41 टक्के मतदान झाले आहे. आता लक्ष निकालाकडे लागले आहे.