शिक्षक पात्रता परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असंख्य चुका

0

पालघर । महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात येणार्‍या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आत्ता पर्यंत अनेकदा घोळ झाल्याचे निर्दशनास आले आहे. शनिवारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात डी. एड, बी.एड, टीइटीच्या शिक्षक पात्रता लेखी परीक्षा घेण्यात आल्या. मात्र यावेळी देण्यात आलेल्या पेपर क्रमांक 1 आणि 2 मधील प्रश्नपत्रिकांमध्ये असंख्य चुका असल्याचा प्रकार उघडकीस आला असून परिक्षार्थींकड़ून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

याचा विपरीत परिणाम परिक्षेला बसलेल्या परिक्षार्थींवर होणार असल्याच्या प्रतिक्रिया परिक्षार्थींनी दिल्या असून राज्यात जवळपास 50 ते 60 हजार परीक्षार्थी या परिक्षेला बसले असल्याची माहिती मिळाली. शिक्षक पात्रतेच्याच परिक्षेत अशा चुका आढळल्या असल्याने इतर परिक्षांमधील प्रश्नपत्रिकांची अवस्था काय असणार असा सवाल व्यक्त होत आहे.