वरणगाव। येथील महात्मा गांधी विद्यालयात दोन वर्षासाठी शिक्षक पालक सभेची निवड करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी सुरेश महाले तर सहसचिवपदी संतोष माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मुख्याध्यापक निकुंभ यांनी पालकांच्या प्रश्नाला उत्तेर दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे शालेय समिती चेअरमन चंद्रकांत बढे होते. यावेळी संस्थाअध्यक्ष वंदना पाटील, उपाध्यक्ष कमलाकर चौधरी, सचिव चंद्रशेखर झोपे, सहसचिव संजय ढाके, सदस्य रविंद्र कोल्हे, दिपक मराठे, कैलास माळी, मुख्याध्यापक आर.आर. निकुंभ , डि.के. महाजन आदी उपस्थित होते. समितीचे पदसिध्द अध्यक्ष मुख्याध्यापक आर.आर. निकुंभ, उपाध्यक्ष सुरेश महाले, सचिव व्ही.आर.गावंडे, सहसचिव संतोष माळी, सदस्य बापू चौधरी, ज्योती लोंढे, अश्वीनी पाटील, जितेंद्र चौधरी, संजय ठोसर,भगवान विसपुते, सुवर्णा चौधरी, मिनाक्षी माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.