मुंबई: शिक्षकांच्या बदल्यांसाठी राज्य सरकारने घेतलेले सर्व शासन निर्णय रद्द करण्याच्या हालचाली सुरु असून बदलीसाठी एकच शासन निर्णय काढण्यात येणार आहे. शिक्षक बदलीत सुसूत्रता आणण्यासाठी आणि शिक्षकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. शासन निर्णयामुळे बदलीसाठी अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो, त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासन वेगवेगळे शासन निर्णय रद्द करून एकच शासन निर्णय काढण्याच्या हालचाली सुरु आहे.