शिक्षक बदल्यांमध्ये जिल्हा परिषदेत सावळा गोंधळ

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने पार पडली असून या बदल्यामध्ये निकषांचे पालन झाले नसल्याच्या आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. या बदली प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रिकरणाचे मोठ्याप्रमाणावर अर्ज होते. मात्र, जागा रिक्त नसल्याचे कारण दाखवून पती पत्नीच्या कार्यक्षेत्रात फार अंतर असल्याने हि बदली प्रक्रिया मुल्यमापन न करताच केल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात आला आहे.

आजाराचे कारण सांगून सोयस्कर ठिकाणी बदली
जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदली प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने झाली असून यामध्ये अनेक शिक्षकांनी खोटी माहिती भरल्यामुळे अनेकांना आपल्या मनाप्रमाणे बदल्यांचे ठिकाण मिळाली तर, काही शिक्षकांवर अन्याय झाला असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पती-पत्नी एकत्रिकरणच्या नियमात तीस किलोमीटरच्या आत नियुक्ती देण्याचा निकष असतांना जागा रिक्त नसल्याचे कारण दाखवून आडमाप पध्दतीने तीस किमीचा निकषाचे पालन करण्यात आले नाही़ परिणामी महिला शिक्षकांची गैरसोय झाली आहे. तर काही नवीन शिक्षकांनी पती-पत्नी एकत्रिकरणाची माहिती भरतांना खोटी माहिती भरुन पती पत्नी 30 किमी पेक्षा जास्त अंतरावर नोकरीला आहेत असे भासविले आहे. त्यामुळे त्यांना तीस किमीच्या आत नियुक्ती मिळाली असुन जुन्या शिक्षकांना खो मिळाला आहे़ काही आयडीयाबहाद्दर शिक्षकांनी दुर्धर आजार व शारीरीक दुखापतीचे नमुद करुन सोयस्कर बदली केली आहे असे जेव्हा काही शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर प्रश्‍न उपस्थीत करत बदली प्रक्रीयेची यादी का देण्यात येत नाही यामुळे बदली प्रक्रीयेत सावळा गोंधळ चालत आहे. याबाबत आपल्या तक्रारी नोंदविण्याकरीता शनिवारी शिक्षकांनी जिप मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर एकच गर्दी केली होती़