शिक्षक मिलिंद पाटील यांची निवड

0

अमळनेर । तालुक्यातील लोंढवे येथील एस.एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मिलिंद प्रभाकर पाटील यांची राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धासाठी पंच म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे. भारतीय खेल महासंघ व युवक सेवा संचनालाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हाक्रीडा परिषद पुणे यांचे संयुक्त विदयमाने राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2016 17 चे आयोजन करण्यात येत आहे. सदरच्या मैदानी क्रीडा स्पर्धा या 19 वर्षांखालील मुले व मुली साठी आहेत. या स्पर्धा 3 ते 7 जानेवारी 2017 दरम्यान होणार आहेत. जगविख्यात अश्या बालेवाडी येथील क्रिडांगरीत या संपन्न होणार आहेत. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.