शिक्षक व ग्रामसेवक हेच गावाचे मुख्य घटक आहेत

0

पिंपळनेर । रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व देशबंधु मंजू गुप्ता फांऊंडेशन व ग्रामपंचायत शिवखट्याळ यांच्या प्रेरणेने डांगशिरवाडे ता.साक्री येथे सात शाळांना सोलर किटचे वाटप करण्यात आले. मुख्यकार्यकारी अधिकारी जे.एन.आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली सोलर कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी गट शिक्षण अधिकारी बी.बी.भिल, पं.स.सदस्य उत्पल नांद्रे, डिजिटल शाळेचे व सोलर शाळेचे जनक हर्षल विभांडीक, बालविकास प्रकल्प अधिकारी एन.के.अहिरराव, विस्तार अधिकारी राजेंद्र पगारे, केंद्रप्रमुख शिरिष कुवर, लक्ष्मण पाटील, भालचंद्र देवरे, धनगर, विजय सोनवणे, पोषण आहर अधिक्षक आर.एच.तडवी, ग्रामसेवक प्रशांत घुगे,सरपंच बेबीबाई सोनवणे (डांगशिरवाडे), बाळू गायकवाड (शिवखटयाळ), काळू अहिरे(वर्दळी) आदी उपस्थित होते.

26 शाळा सोलार सिस्टम
यावेळी आभाळे पुढे म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करणे महत्वाचे आहे. त्यासाठी हर्षल विभांडीक व उत्पल नांद्रे यांचे काम या दृष्टीने उल्लेखनीय आहे. यावेळी हर्षल विभांडीक यांनी सांगितले की, आत्तापर्यंत 26 शाळा सोलर शाळा झाल्या. जानेवारी अखेर 100 शाळा सोलर शाळा होतील व सर्व जि.प.शाळांना मोफत वाय-फाय सेवा पुरविली जाणार आहे. या कार्यक्रमात सात शाळांना सोलर किट देण्यात आले त्यात मारोतीपाडा, शिव, शिवखटयाळ, विजयपूर, वडखुट, वर्दळी,चिंचपाडा. यासात शाळा शिवखटयाळ गृप ग्रामपंचायत अंतर्गत येतात. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.नेरे यांनी केले तर आभार शिरीष कुवर यांनी मानले.