चाळीसगाव । नेहरु युवा केंद्र भारत सरकार संलग्न संस्था, क्रांती ग्रामविकास संस्था, साप्ताहिक विश्वनायक वृत्तपत्र बीड-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने संत-मंहत-महापुरुष समाज सुधारक, शास्त्रज्ञ, सैनिक, शेतकरी यांचे विचार व कार्यप्रणालीचे स्मरण करुन 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे विश्वनायक राष्ट्रीय क्रांती प्रेरणा पुरस्कार 2017 सोहळा दिल्ली येथील मालवणकर सभागृहात पार पडला. देशभरातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या एकूण 65 व्यक्तिंना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
चाळीसगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राष्ट्रीय अंधशाळेचे विशेष शिक्षक सचिन सोनवणे यांना अंध विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्रीय मानव संसाधन एवं विकास मंत्री तथा संसदीय समिती अध्यक्ष सत्यनारायण जटीया यांच्या हस्ते राष्ट्रीय विश्वनायक क्रांती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी रामदास आठवले, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे, भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी मिलिंद गवई, ह.भ.प.बोधळे महाराज, सुरेश यादव, नितीन पाटील, सुहासिनी केकाणे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष एम.बी.पाटील, अरुण निकम, उपाध्यक्ष डॉ. संजय देशमुख, संजय पाटील आदींनी पुरस्कार मिळाल्या बद्दल शिक्षक सचिन सोनवणे यांचे कौतुक केले अहे.