पहूर ता.जामनेर । शिक्षक दिनाचं औचित्य साधून पहुर येथील स्व. कडूबासाहेब वानखेड़े स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात येते. या वर्षी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासनाच्या कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जि.प. शाळा लेले नगर पहुर येथील प्राथमिक शिक्षक उमेश देशमुख आणि माध्यामिक विभागात नावोपक्रम राबविल्याबद्दल विद्यार्थीप्रिय शिक्षक शंकर भामेरे यांचा मानपत्र देवून मान्यवरांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिक्षक पुरस्काराचे वितरण
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पं.स. सभापती बाबुराव घोंगडे होते. प्रमुख अतिथी ग.स. सोसायटी संचालक अनिल गायकवाड, समाधान पाटिल, लक्ष्मण गोरे, तुकाराम जाधव, मधुकर लहासे, मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे, महेश मोरे, भानुदास पाटिल, समाधान कोळी आदि होते. संस्थचे सचिव रामचंद्र वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन अपाध्यक्ष गणेश राऊत यांनी केले. डॉ. प्रा.गोपाल वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन हरिभाऊ राऊत यांनी केले तर आभार भगवान जाधव यांनी केले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.