डॉ.नितीन करमळकर यांनी केले मार्गदर्शन
चिंचवड : शिक्षण क्षेत्रात पारंपरिक प्रतिकाला चिकटून न बसता आधुनिकतेचा अंगिकार केला पाहीजे. आजची शिक्षणपध्दतीही पारंपरिकता आणि आधुनिकता यांच्या समन्वयातुन विकसित होईल. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उर्जा असते. तिला विधायक वळण मिळायला हवे. कौशल्याआधारित अभ्यासक्रमाचा समावेश शिक्षणात फार मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे. शिक्षणातल्या भिंती काळानुसार गळुन पडल्या पाहिजेत. विद्यार्थ्याला शिकतांना त्याच्या आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र मिळाले पाहिजे. यासाठी पुणे विद्यापीठही प्रयत्नशिल आहे. काळाचा वेध ज्याला घेता येतो तोच यशस्वी होतो. म्हणुनच की काय पुणे विद्यापीठाने देशाच्या पहिल्या शंभरात स्थान पटकावले आहे. यामध्ये तुम्हा सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांचे योगदान महत्वाचे आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी प्रतिपादन केले. प्रा. रामकष्ण मोरे महाविद्यालयात बी.व्होक.अभ्यासक्रमाचे उद्घाटन तसेच इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन डॉ. करमळकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
हे देखील वाचा
महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोहर चासकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या शैक्षणिक यशाचा आलेख स्पष्ट करतांना यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.तुषार शितोळे, डॉ.अभय खंडागळे, डॉ.पदमा इंगोले, डॉ.कल्याण जगदाळे, डॉ.संतोष जगताप, प्रा.अपर्णा पांडे या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. डॉ.अरविंद तेलंग करंडक मिळाल्याबद्दल दीपक पवार, मयुरी गायकवाड या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. आभार उपप्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांनी मानले तर सुत्रसंचालन डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी केले.