शिरूर । राज्यात शिक्षण क्षेत्रात शिरूर तालुक्याचे नाव आघाडीवर आहे. शिष्यवृत्तीमधील गुणवत्ता यादीतील हेच विद्यार्थी पुढे यूपीएससी व एमपीएससीसाठी निवडले जातात, असे उद्गार शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी काढले.
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणगौरव व सत्कार कार्यक्रम समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या यावेळी पाचर्णे बोलत होते. ही पतसंस्था राज्यात अग्रेसर आहे. या पतसंस्थेप्रमाणे शिरूर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे कामही राज्यात प्रेरणादायी असेच आहे, असे पाचर्णे यांनी पुढे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचाय समिती सभापती सुभाष उमाप होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, अशोक पवार, जिल्हा बँकेचे संचालक निवृत्ती गवारे, वर्षा शिवले, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे, राजेंद्र नरवडे, पंचायत समिती उपसभापती मोनिका हरगुडे, सदस्या अर्चना भोसुरे, सविता पर्हाड, प्रतिभा शेलार, स्वाती पाचुंदकर, जयमाला जकाते, अरुणा घोडे, विक्रम पाचुंदकर, विजय रणसिंग आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याण कोकाटे यांनी आभार मानले.