जि.प.चे तत्कालीन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांची पोलिसात फिर्याद
जळगाव : जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांची बनावट स्वाक्षरी करुन बोगस भरती करण्यात आल्याने जिल्ह्यातील दोन शिक्षण संस्था चालकांविरुध्द जळगाव शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
सविस्तर असे, जि.प.चे तत्कालीन शिक्षणाधिकारी तथा नाशिक मनपाचे विद्यमान शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी जळगाव शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. संस्थेमध्ये शिक्षकांचे रिक्त झालेले पदे आणि नवीन पदे भरण्यासाठी शिक्षण संस्थांना शिक्षणाधिकार्यांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, गिरणाई शिक्षण संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा, धनदाई माता एज्युकेशन सोसायटी (प्र.डांगरी) संचलित जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जि.जळगाव या संस्थांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीअंती दोषींवर कारवाईचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
संस्थांकडून शासनाची फसवणूक
गिरणाई शिक्षण संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा या संस्थेच्या संचालकांनी शासन निर्णयानुसार शाळेस 8 पदे मंजुर होती व 8 कर्मचारी कार्यरत असतांना बनावट संच मान्यतेच्या आधारे कर्मचार्यांची संस्थेत नेमणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शिक्षण विभागाचा बनावट आदेश व शिक्षणाधिकार्यांची बनावट स्वाक्षरीने कर्मचार्यांचे शालांत आयडीसाठी बनावट स्वाक्षरीने प्रकरण तयार करुन शिक्षणाधिकार्यांमार्फत सादर न करता शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या कार्यालयात सादर न करता शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडून शालांत आयडी प्रकरण मंजूर करुन घेतले.
धनदाई माता एज्युकेशन सोसायटी (प्र.डांगरी) संचलित जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जि.जळगाव यांनी मंजूर पदे रिक्त नसतांना संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव, संचालक मंडळ, मुख्याध्यापक यांनी शिक्षणाधिकारी म्हणून बनावट स्वाक्षरीद्वारे आदेश तयार केले. कर्मचार्यांचे शालांत आयडीसाठी बनावट स्वाक्षरीने प्रकरण तयार करुन शिक्षणाधिकार्यांमार्फत सादर न करता शिक्षण उपसंचालक, नाशिक यांच्या कार्यालयात सादर न करता शिक्षण उपसंचालक, नाशिक यांच्याकडून शालांत आयडी प्रकरण मंजूर करुन घेतले.
बनावट स्वाक्षरी आणि बनावट आदेश तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गिरणाई शिक्षण संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा, धनदाई माता एज्युकेशन सोसायटी (प्र.डांगरी) संचलित जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जि.जळगाव या संस्थेतील संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक यांच्या विरुध्द तत्कालीन शिक्षणाधिकारी तथा नाशिक मनपाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.