शिक्षणाने व्यक्तीचा, समाजाचा व देशाचा विकास होतो

0

नंदुरबार। शिक्षणाने व्यक्तीचा विकास होतो, पर्यायाने समाजाचा व देशाचा विकास होतो, असे प्रतिपादन सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र केदार यांनी केले. ते येथील वंजारी सेवा संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. यावेळी 60 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. येथील पी.के.आण्णा पाटील प्राथमिक शाळेत वंजारी सेवा संघाच्यावतीने भगवान बाबांच्या 121 व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी व समाजात विशेष उल्लेखनिय केलेल्या बांधवांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र केदार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, तालुका कृषी अधिकारी अनिल कागणे, पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब केदार, नायब तहसिलदार राजेंंद्र दराडे, पी.के.आण्णा पाटील शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ, वंजारी सेवा संघाचे पुरुषोत्तम काळे, कैलास काळे, सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भाबड, डॉ.हेमंत नागरे आदी उपस्थित होते.

वंजारी सेवा संघाच्यावतीने 60 विद्यार्थ्यांचा गुणगौरव
राजेंद्र केदार मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत सातत्य, चिकाटी ठेवून निर्व्यसनी राहून विद्यार्थी परायण असावेत, खर्‍या अर्थाने संत भगवान बाबांना ही एक आदरांजली आहे. श्री संत भगवान बाबांनी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह व शाळा काढल्यात. ऋण काढा, पण शिक्षण पूर्ण करा, असा संदेश सद्गुरु भगवान बाबांनी समस्त भक्तगणांना केला होता. त्याचा आदर्श घेत वंजारी सेवा संघाच्या नंदुरबार जिल्हा शाखेने गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून केलेला गुणगौरव हा खर्‍या अर्थाने बाबांचे विचार तळागाळात पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न अभिनंदनीय आहे असे विचार केदार यांनी व्यक्त केले. तसेच तहसिलदार राजेंद्र दराडे, नंदकुमार साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. अखिल भारतीय वंजारी सेवा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुरुषोत्तम काळे यांची निवड झाल्याने जिल्हा शाखेच्यावतीने मानपत्र देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. सेवा संघाच्यावतीने रनाळे येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अभ्यासिका केंद्रास दोंडाईचा येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.हेमंत नागरे यांनी एक लाख रुपयांची स्पर्धा परीक्षा पुस्तके देण्याचे जाहीर केले. सुत्रसंचालन राकेश आव्हाड तर आभार शरद घुगे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कुणाल फटकाळ, राहुल नागरे, भाऊसाहेब वंजारी, राहुल आघाव, महेंद्र चकोर, राकेश घुगे, योगेश गाभणे, विरेंद्र चकोर, नरेंद्र नागरे, देवेंद्र सांगळे, भुषण काळे, सिद्धांत खाडे, निंबा बडे, विजय ओगले, छोटू कळकाटे आदींनी कामकाज पाहिले.