शिक्षणावर लक्ष केंद्रीत केल्यास समाजाचा विकास शक्य

0

रावेर : तालुक्यातील कर्जोद येथे मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालयात वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार होते. त्यांनी आपल्या आध्यक्षीय भाषणात सांगितले की, समाजाने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या मुलांना शिक्षण द्या. एकवेळ जेवा परंतु शिक्षण प्राप्त करा. स्पर्धा परिक्षेत सहभागी व्हा, यातूनच समाजाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

नगराध्यक्षांचा सत्कार
कार्यक्रमाचे उद्घाटन एम.आय. तेली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुन्ना तेली यांच्या हस्ते करण्यात आले तर मौलाना आझाद पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश धनके यांच्या हस्ते करण्यात आले. रावेरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांचा वाचनालयातर्फे सत्कार करण्यात आला.

सन्मानित करण्यात आलेले शिक्षक
गौसखान रसलपूर जिल्हा परिषद उर्दू शाळा, कलीम शेख जिल्हा परिषद उर्दू शाळा खानापूर, तनवीरुलहक जिल्हा परिषद उर्दू शाळा कर्जोद, अशफाक अहमद रावेर, अ. अजित केर्‍हाळा, आसिफ अहेमद निंभोरा, एम.आय. शेख रावेर अँग्लो, इकबाल शेख खिर्डी, शायर नूसरत शवेरी व साहित्यिक अहेमद कलीम फैजपूरी, पत्रकार मो. कलीम यांना सन्मानित करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी अ‍ॅड. एम.ए. खान, केंद्रप्रमुख शकिल सईद, अफसर खान, गौसखान यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक कैलास काळे, अमोल पाटील, कर्जोद सरपंच सकिना तडवी, सोपान पाटील, सै. असगर, मो. हनिफ, शे. इरफान, आरिफ शेख, शे. अनिस, एम. उस्मानी, अ‍ॅड. एस.एस. सैय्यद, आसिफ मो., गयास अ. समद, शरिफ शेख, आर.आर. शेख, हाजी अनिस शेख, निलेश सावळे, आशिष पाठक, देवचंद ससाणे, दिपक नगरे, निलेश राजपूत, कुमार नरवाडे, समशेर खान, सुनिल चौधरी आदी उपस्थित होते.