शिक्षणासाठी “स्वयंम प्रभा”

0

“स्वयंम प्रभा” या उपक्रमात एकूण ३२ डी.टी.एच चैनल्सचा गृप तयार करण्यात आला असून हे सर्व चैनल्स हे उच्च स्तरीय व्हिडीओ प्रसारण करण्यास सक्षम आहे व त्यांच्या व्दारे प्रक्षेपणासाठी GSAT-15 या उपग्रहाचा सुध्दा वापर केला जात आहे. स्वयंम प्रभा या उपक्रमाव्दारे दररोज नवीन व कमीत कमी चार तासाचे शैक्षणिक उपक्रम दाखविले जातात आणि त्यांचे पुनप्रसारण दिवसातून पाच वेळा केले जाते यामुळे विद्यार्थी हे त्यांच्या सोयी नुसार त्या उपक्रमांना पाहू शकतात. या चैनल चे व्यवस्थापन Bhaskaracharya Institute for Space Applications and Geoinformatics (BISAG) गांधीनगर येथून केले जाते.

स्वयंम प्रभा या उपक्रमाव्दारे दाखविण्यात येणारे व्हिडीओ हे देशातील नामवंत शैक्षणिक संस्थाव्दारे उपलब्ध करून देण्यात येतात यामध्ये NPTEL, IITs, UGC, CEC, IGNOU, NCERT आणि NIOS यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. स्वयंम प्रभा या उपक्रमाचे चे पोर्टल हे “इनफ्लीबनेट” गांधीनगर (Information and Library Network, Gandhinagar) या संस्थेव्दारे व्दारे चालविले जाते. दुरदर्शनच्या मोफत डी. टी.एच चॅनेल वर याचे प्रसारण पाहता येते

संकलन
प्रा. हितेश ब्रिजवासी
ग्रंथपाल
विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत
के.ए.के.पी वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जळगाव