विक्रोळी | विक्रोळी पार्क साईट विभागातील विविध क्षेत्रातअग्रेसर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी सेवा संघ,विक्रोळी(रजि,)तर्फे सिंधुदुर्ग रहिवाशी इ,10 वी.व इ 12 वी.मध्ये उतीर्ण झालेल्या विद्यार्थीवर्गाचा सत्कार प्रमुख पाहुणे मुंबई महानगरपालिका महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याहस्ते संदेश विद्यालय,पार्क साईट,विक्रोळी(प.)येथे पार पडला. यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थींनी यांना पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन महापौर महाडेश्वर यांच्याहस्ते गौरविण्यात आले. उपस्थित पालाक व विद्यार्थी-विद्यार्थींनी यांना मार्गदर्शन करताना महापौर महाडेश्वर यांनी प्रत्येकाला शिक्षणासोबत संस्कार मिळायला हवे. शिवाय प्रत्येकाने माणूस म्हणून जगायला शिकायला हवे. फक्त माणसाने माणसासारखे दिसून उपयोग नाही,त्याच्यात माणसाचे गुण हवेत.शिवाय तारुण्य,सौदर्य,संपत्ती व सता यांचा अहंकार करु नये.या चार गोष्टी कधीच कायम राहत नाहीत.ज्याने आई-वडील यांची उपासना व पत्नीची जोपासणा केली तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे महाडेश्वरांनी सांगितले.
विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात कायम नंबर एक कसे राहता येईल यासाठी धडपड करायला हवी. मलाही हिम्मत जी मिळाली आहे ती केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच.त्यांनी शिवसैनिकांना हिम्मत दिली.
-विश्वनाथ महाडेश्वर
मान्यवरांची उपस्थिती
संघाध्यक्ष सुहास पांचाळ, स्थानिक नगरसेविका स्नेहल मोरे,एन प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश पाटील,माजी नगरसेवक सुधीरभाऊ मोरे,शिवसेना शाखा 123 च्या संघटिका प्रतिक्षाताई पवार,शाखाप्रमुख जनार्दन पार्टे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सुनिल बागवे,श्रीराम वैद्य,एकनाथ शिरसाट यांच्या उपस्थितीत पार पडला.
सोहळ्याची सांगता
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक सदानंद आचरेकर,संकल्पक अशोक सावंत,सचिव सत्यवान शिंदे,कार्याध्यक्ष मुकुंद सावंत,खजिनदार कृष्णकांत म्हाडदळकर,सल्लागार महेश जावकर,सुनिल बागवे यांच्यासह पुरुष-महिला सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचालन चंद्रकांत कदम यांनी त सुहास पांचाळ यांनी आभारप्रदर्शनाने गुणगौरव सोहळ्याची सांगता केली.