शिक्षणासोबत खेळालाही वेळ द्या-नितीन शिलवंत. किनगाव इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुलमध्ये तालुका क्रिडा स्पर्धांचे उद् घाटन.
यावल ( प्रतिनीधी )तालुक्यातील किनगाव येथील किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुलमध्ये तालुकास्तरीय शासकीय क्रिडा स्पर्धांचा शुभारंभ शुक्रवार दि.२५ रोजी झाला या कार्येक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुलचे सचिव व बालाजी डेव्हलपर्स आणी व्ही.मार्ट.चे सर्वेसर्वा मनिष विजयकुमार पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बँकआँफ इंडीया किनगाव शाखेचे व्यवस्थापक नितीन शिलवंत व शिक्षण विस्तार अधिकारी विश्वनाथ धनके होते.कार्येक्रमाच्या सुरूवातीला विद्येचे दैवत माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले यावेळी मंचावर केंन्द्रप्रमुख कविता गोईल,मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जयंत चौधरी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील के.यु.पाटील,सातपुडा माध्यमिक विद्यालय नायगाव चे बी.डी.पाटील साकळी चे अशपाक शे. इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापक सौ.पुनम मनिष पाटील प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील उप प्राचार्या सौ.राजश्री सुभाष अहिरराव तालुका क्रिडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले इ.उपस्थीत होते.यावेळी के.यु.पाटीलसर,मनिष पाटीलसर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या तर मलाही लहानपणी क्रिकेट खेळण्याची आवळ होती व शिक्षण सुरू असतांना आम्हीपण मित्रांनसोबत दोन संघ तयार करून क्रिकेट खेळत होतो कोणताही खेळ खेळा मात्र शिक्षणासोबत खेळालाही तितकेच महत्व द्या असे किनगाव स्टेट बँकेचे व्यवस्थापक नितीन शिलवंत यांनी सांगीतले.दि.२५ आँगस्ट ते ११ सप्टेबर पर्यंत चालणाऱ्या या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धांनमध्ये क्रिकेट,कबड्डी,कँरम,मैदानी, खाे-खाे व कुस्ती या क्रिडा स्पर्धा होणार आहेत तर पहील्या दिवशी क्रिकेट,कँरम व कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या क्रिकेट,कुस्ती व कॅरम स्पर्धांनमध्ये इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगावच्या १४ व १७ वर्षाआतील क्रिकेट संघाचा सामना पाेदार स्कूल भुसावल यांच्याशी होता या सामन्यात पोदार स्कूलने ८ वोव्हर मधे २९ रनांचे लक्ष दिले मात्र इंग्लिश मीडियम किनगावच्या च्या १४ वर्षाआतील ओपनर जाेडीनी ४ ओवर मधे हे लक्ष साधत विजय संपादन केला
तसेच इग्लिश मीडियम स्कूल च्या १७ वर्षा
आतील मुलांनी ८ ओवर मधे १४४ धावांचे लक्ष दिले यात रोशन बारेला व शिवम बारेला या दाेन्ही फलंदाजांनी प्रत्यकी ५०-५० धावांची अर्धशतकी खेळी केली तर १४४ रनांचे लक्ष साध्य करतांना पेादार स्कूलच्या खेळाडूंनी ८ ओवर मधे फक्त ३८ धावा केल्या व त्यांना पराभवाचा सामना करावा लागला या स्पर्धांसाठी इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलचे शिक्षक हर्षल मोरे,योगीता बिहारी,देवयानी साळुंखे,मिलींद भालेराव,भावना चोपडे,प्रतिभा धनगर,गोपाल चित्ते,पवनकुमार महाजन, सुहास भालेराव,प्रतिक तायडे,पुजा तायडे,सोनाली कासार,प्रतिभा पाटील, बळीराम कोतवाय,शेखर पाटील,वैशाली चौधरी,योगीता सावडे,रोहित बावीस्कर,मयुरी बारी,तिलोत्तमा महाजन,सोनाली वाणी,रत्ना बाविस्कर,वैशाली बडगुजर, बाळासाहेब पाटील यांनी परिश्रम घेतले.