धुळे। जुलै-ऑगस्ट 2017 मध्ये होणार्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा तणावमुक्त होण्याच्या दृष्टीने परिक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना ताणतणावांचे व्यवस्थापन व समस्या/शंकांचे निरसन करण्यासह विद्यार्थी व पालकांना यथायोग्य मार्गदर्शन मिळणेसाठी विभागीय मंडळामार्फत जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ज्या विद्यार्थी/पालकांना परिक्षेसंदर्भात काही ताणतणाव/समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकांकडे संपर्क साधल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल तर समुपदेशनाची सुविधा ही 2 ऑगस्ट, 2017 पर्यंत सुरु राहणार असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आर.आर.मारवाडी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.