जळगाव: वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी त्वरित मंजूर व्हावी, प्रवास भत्ता देयके नियमित मिळावी, विना चौकशी एकतर्फी कारवाई होवू नये, रिक्त पदांची भरती करून कामाचा बोजा कमी करावा, गुणवत्ता विकास कार्यक्रमात एकसुत्रता असावी यासह अनेक विषयांवर जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या सभेत चर्चा करण्यात आले. अनिल बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला शिक्षण विस्तार अधिकारी एन.आर.तडवी रावेर, विजय पवार , बी.डी. धाडी, रविकिरण बिऱ्हाडे, फिरोज पठाण, नईमुद्दिन शेख , विश्वनाथ धनके, राजेंद्र सपकाळे, सरला पाटील, नरेंद्र चौधरी यांच्यासह जिल्ह्याभरातील शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. प्रस्ताविक राजेंद्र सपकाळे यांनी केले. जिल्हा कार्यकारिणी काही पदे रिक्त होती, त्या पदांवर नवीन नियुक्ती अध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी केली.