यावल : देशांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन केले असून मोलमजुरी करण्यासाठी बाहेर राज्यात अनेक नागरीक गेले असलेतरी लॉकडाऊनमुळे गावाकडे जाण्यासाठी कुठलेच वाहन नाही मात्र असलेतरी काही नागरीक पायी प्रवास करीत आहेत. असेच भरुच ते अकोला पायदळ प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांना जिल्हा परीषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र (छोटूभाऊ) पाटील यांनी जळगावात गाडी थांबवून या नागरीकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करीत त्यांना जळगावच्या लाडवंजारी मंगल कार्यालयात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून दिली. लाडवंजारी मंगल कार्यालयापर्यत त्या नागरीकांना सोडण्यासाठी जळगांव येथील मुस्लीम बांधवांनी त्यांच्या रीक्षात विनामूल्य सेवा देत माणुसकीही जपली. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून त्या सर्व नागरीकांची अकोला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली. यावेळी प्रभू सोनवणे उपस्थित होते.