मुंबई :- मोदी सरकारच्या शेवटचे बजट अत्यंत निराशाजनक आहे. शेतकऱ्यांची पुरेपूर निराशा झाली आहे. बजेटमध्ये शिक्षणासाठी अपुरी तरतूद केली आहे. शिक्षणासाठी 1 लाख कोटी कसे पुरणार. एकट्या महाराष्ट्राला 24 हजार कोटी लागतात. सरकारने अनेक शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे.
शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचे काम मात्र जोमाने सरकार करत आहे. या सरकारचे हे शेवटचं बजेट शेतगरिबाला समान्यांना काही आशा देईल अस वाटत होतं मात्र पुरती निराशा झाली आहे. यामध्ये रोजगारनिर्मिती शक्यता नाही. यामध्ये मुंबईकरांसाठी सुद्धा अत्यंत निराशाजनक बजेट आहे. महानगरात वाहतुकीसाठी काहीही तरतूद नाही. तरुण निराश, शेतकरी आणि गरिबांसाठी अत्यंत निराशाजनक बजेट आहे.
– आमदार कपिल पाटील
जनता दल