पुणे : राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांचा मुलगा श्रीशैल गंगाधर म्हमाणे याचे आज बुधवारी अकस्मात निधन झाले. २० दिवसापूर्वी लग्न श्रीशैलचे लग्न झाले होते. अवघ्या विसाव्या दिवशी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सोलापूर जिल्हयातील कोरवली या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निधनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही.निधनाचे वृत्त समजताच शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी कोरवली गावाकडे धाव घेतली आहे .