जळगाव : आगामी काळात औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्राच्या विस्तारासाठी कुशल मनुष्यबळाची गरज असून औद्योगिक क्षेत्रात मेळ राखण्याकरिता औद्योगिक क्षेत्र, उद्योजक अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये समन्वयाची गरज असून एकमेकांच्या सहयोगाने काम केल्या शिवाय अभियांत्रीकी क्षेत्रात प्रगती शक्य नसल्याचे मत छबिराज राणे यांनी व्यक्त केले. एस. एस. बी. टी. अभियांत्रिकीत आयोजित रोजगार प्रशिक्षण संबंधित चर्चासत्रात ते बोलत होते. एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग आणि छबी इलेक्ट्रिकल्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ’कौशल विकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण’ या विषयावर महाविद्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या वेळी रोजगार प्रशिक्षण सल्लागार किशोर चाफेकर त्रिविध टेक सोल्युशन्स प्रा.लि.चे आनंद मोने उपस्थित होते. नवनवीन संकल्पना मनात असतानासुद्धा कुशल मनुष्य बळाअभावी त्या प्रत्यक्षात अंमलात आणता येत नाहीत, अशी खंत व्यक्त करून महाविद्यालयातील अत्याधुनिक सोयीसुविधा प्रयोगशाळा यांचा विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यास उपयोग केला जाऊ शकतो. तसेच छबी इलेक्ट्रिकल्सचे प्रोजेक्ट्स महाविद्यालय परिसरातच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून पूर्ण करता येतील, असे राणे यांनी या वेळी सांगितले. या वेळी बोलताना रोजगार प्रशिक्षण सल्लागार चाफेकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी प्रशासकीय संचालक तथा अँड टी.सी. विभागप्रमुख डॉ.एस.आर.सुरळकर, इलेक्ट्रिकल विभागप्रमु डॉ.पी.जे.शाह, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ.एस.ए. ठाकूर, छबी इलेक्ट्रिकल्सचे मोहन चौधरी शैलेंद्र हिंगोणेकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे समन्वयक आदी उपस्थित होते.