जळगाव: देशांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन केले आहे. मोलमजुरी करण्यासाठी बाहेर राज्यात अनेक नागरिक गेले आहे, पण आता लॉकडाऊन असतांना गावाकडे जाण्यासाठी कुठलेच वाहन नाही. भरुच ते अकोला पायदळ जाण्यासाठी नागरिक निघाले होते. जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांना जळगाव येथून जातांना दिसले त्यांनी लागलीच गाडी थांबवून त्या नागरिकांची विचारपूस करून त्यांना जळगांव येथील लाडवंजारी मंगल कार्यालयात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून दिली. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून त्यासर्व नागरिकांची अकोला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून देणार आहे. यावेळी प्रभू सोनवणे सोबत होते.