पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण समिती स्थापनेचा निर्णय तज्ज्ञ लोकांना संधी मिळवून देण्यासाठी निर्णय लांबणीवर पडला होता. परंतु, समिती स्थापन करण्याबाबत शनिवारी (दि. 20) होणार्या महापालिका सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
शिक्षण मंडळ बरखास्त करून महापालिकेत शिक्षण समिती स्थापण्यात येणार आहे. मात्र, ही समिती विषय समित्यांप्रमाणे नगरसेवकांची समिती असणार आहे. मात्र, महापालिकेत स्विकृत सदस्यसंख्या वाढवून कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. तशा सुचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पदाधिकार्यांना दिल्या होत्या. महापालिकेच्या विधी समितीमध्ये 9 नगरसेवकांबरोबर 4 शिक्षण क्षेत्रातील तज्ञ अशा एकूण 13 सदस्यांचा समावेश असावा. असा प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर करून महापालिका सर्वसाधारण सभेकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मात्र, दोन सर्वसाधारण सभांमध्ये भाजपने हा विषय तहकूब ठेवला आहे.