शिक्षित कामगारापेक्षा नवनिर्मितीचा ध्यास घेवून उद्योजक बनावे

0

पिंपरी- विद्यार्थ्यांनी शिक्षित कामगार होण्यापेक्षा नवनिर्मितीचा ध्यास घेऊन उद्योजक बनावे असा संदेश अमेरिकेतील रगॅनिक बॉटस कं पनीचे संचालक प्रशांत सरोदे यांनी दिला. यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे संशोधन केंद्राचे राजर्षि शाहू कॉलेज ऑफ इंजि निअरिंमध्ये उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अमेरीका स्थित ऑरगॅनिक बॉटस या कंपनीत आणि राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनीरिंग विभागात शैक्षणिक आणि संशोधन सामंजस्याचा करार झाला. या क राराद्वारे महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना यंत्र मानव निर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे विशेष प्रशिक्षण अमेरिका स्थित तज्ज्ञ मंडळीकडून मिळणार आहे.

महाविद्यालयात अद्यावत प्रयोगशाळा उभारणी
संगणक विभाग प्रमुख प्रा. सीमा केदार यांनी ऑरगॅनिक बॉट या कंपनीत संपर्क साधला. कंपनीचे भारतीय संचालक श्रीकांत पाटील आणि प्रशांत सरोदे यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण महाराष्ट्रातच पूर्ण झालेले असल्यामुळे. त्यांनी कंपनीचे संशोधन केंद्र राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारण्याचे मान्य केले आहे. यासाठी महाविद्यालयाने एक अद्यावत प्रयोगशाळा यासाठी उभारली आहे. या संशोधन केंद्रात यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या संशोधनाबरोबरच विद्यार्थ्यांना या क्षेत्रात स्वतःची कं पनी उभारण्याचे सर्व मागदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमधील आंत्रप्रिनर किंवा उद्योजक गुणांचा विकास होऊन ते स्वतःची कंपनी सुरु करू शकतील.

सहकार्य करारासाठी योगदान
हा शैक्षणिक सहकार्याचा करार पूर्णत्वासाठी जेएसपीएमचे संस्थापक सचिव आमदार प्रा. टी जे सावंत यांचे प्रोत्साहन आणि अमूल्य मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के जैन यांनी हा शैक्षणिक करार प्रत्यक्षात येण्यासाठी विशेष योगदान दिले. ताथवडे संकुलाचे सहायक संचालक रवी सावंत, कार्यकारी संचालक प्रा. सुधीर भिलारे, उप प्राचार्य प्रा. ए एस देवस्थळी, संगणक विभाग प्रमुख प्रा. सिमा केदार यांची विशेष मदत झाली. प्रा. एस बी जव्हेरी यांनी सामंजस्य करार यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कविता मोहोळकर यांनी केले.