शितल फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

0

तर्‍हाडी । शिरपूर तालुक्यातील चांदपूरी येथील शितल फाऊंडेशनतर्फे विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण झाले.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास पाटील, उपाध्यक्ष अविनाश पाटील, सरपंच भरत मोरे व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते. पुढील वर्षी फाऊंडेशनतर्फे गावात ‘एक मुल एक झाड’ हा संकल्प राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भैय्या पाटील, भावेश पाटील, भूषण पाटील, कल्पेश पाटील, लोटन पाटील, ग्रामसेवक महेश गिरासे यांच्यासह शितल फाऊंडेशनचे सदस्य यांनी परिश्रम घेतले व एक हजार झाडे जगविण्याचा संकल्प केला.