चाळीसगाव । घरची परिस्थितीची गरीबीची असतांना निरा न होता मेहनतीच्या जोरावर पोलीस दलात भरती झालेला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शिपाई रमेश अमृत पाटील यांचा मुलगा खातेतंर्गत पोलीस उपनिरीक्षक परिक्षा पास होऊन पीएसआय बनला आहे. या अगोदर तो मुंबई पोलीसात पोलीस शिपाई पदावर कार्यरत होता. मुळचे पाचोरा तालुक्यातील रहिवासी रमेश पाटील यांना चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिपाई पदावर नोकरी लागल्याने ते मालेगाव रोड वरील हॉटेल आशिषच्या मागे वास्तव्यास होते. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.