शिपायास लाच घेताना पकडले

0

तळेगाव  : पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपायास 2 हजारांची लाच स्विकारताना एबीसीच्या पथकाने सोमवारी तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात रंगेहाथ पकडले आहे. सुर्यकांत भुजबळ (वय 52) असे लाच स्विकारणार्‍या परिचारकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याकडे एक पाळीव गाय होती व त्या गाईचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल देण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपाई सुर्यकांत भुजबळ यांनी तक्रारदाराकडे 2 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ही बाब तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे नोंदविली. या तकारीची शनिवारी (दि.3) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता भुजबळ यांनी लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार सोमवारी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तळेगाव ढमढेरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात 2 हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. भूजबळ यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.