पुणे । केंद्र सरकारच्या शिपींग बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत यांची निवड करण्यात आली आहे. 1999 ते 2004 या कालावधीत ते पुण्याचे खासदार होते.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महत्वाची कामगिरी पार पाडली होती. शहरात भाजपचा खासदार निवडून आणण्यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची मानली जाते. याविषयी त्यांच्याशी संपर्क साधला असता शिपींग बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. मिळालेली जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.