शिबिराचा समारोप म्हणजे खऱ्या अर्थाने प्रशिक्षणाची परिपूर्ती

0

मुक्ताईनगर : येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाततर्फे आयोजित घोडसगाव येथील विशेष हिवाळी शिबीराच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर. पाटील यांनी विशेष हिवाळी शिबीराचा समारोप म्हणजे खर्‍या अर्थाने प्रशिक्षणाची परिपूर्ती आहे असे प्रतिपादन केले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित रासेयो स्वयंसेवकांना जीवनात उच्च ध्येय प्राप्तीसाठी केवळ शैक्षणिक प्रगती आवश्यक नाही तर त्यासोबत सामाजिक क्षेत्रातील प्रगतीसुध्दा पोषक ठरत असते. व यासाठीच विद्यार्थी जीवनात अशा शिबीरांची गरज आहे.

भविष्यात या शिबीराचा तुम्हाला तुमच्या जीवनात उच्च ध्येय गाठण्यासाठी निश्‍चित उपयोग होईल व तेव्हा तुम्हाला जीवनाची परिपूर्ती झाल्याचा अनुभव येईल ऐसे मत व्यक्त केले. या समारोप्रसंगी मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक एम.जी.वराडे, प्राध्यापक ईस्माईल हुसेन यांची उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांनी केले अनुभव व्यक्त
समारोप्रसंगी के.एस.पाटील, नेहा सोनवणे या विद्यार्थ्यांनी आपले शिबीरातील स्वानुभव व्यक्त केले. तसेच हे शिबीरातील अनुभव आपल्या जीवनातील शिदोरी प्रत्येकाने जपून ठेवावे असे स्वयंसेवकांना आवाहन केले. या शिबिराचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.पी. चौधरी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर.टी. चौधरी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. वंदना चौधरी व रासेयो स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेवून केले होते संचालन अजय पाटील याने तर आभार सुधाकर पाटील याने मानले यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व रासेयो स्वयंसेवकांनी सहकार्य केले.