ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
शिरगाव- येथे दारुंब्रे रस्त्यावर गावातील दीपक आरगडे व सोमनाथ गोपाळे यांनी त्यांच्या घराजवळ आलेला बिबट्या पहिला आणि आरडा-ओरड केल्याने तो नदीकडे गेल्याचे यांनी सांगितले. याभागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांना संध्याकाळी एकटे बाहेर न पडण्याचे आवाहन वनविभाकडून करण्यात आले आहे. शिवाय बिबट्या दिसल्यास काय खबरदारी घ्यावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जर गेल्या पंधरा दिवसांपासून या भागात बिबट्या दिसतो आहे आणि त्यासाठी वनविभागाकडून कोणतीच ठोस कारवाई होत नाही याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
परवानगी मिळाल्यावर कार्यवाही
याविषयी अधिक माहिती देताना वडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले म्हणाले की, ही माहिती आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले आहेत. त्यांच्याकडून तसे आदेश आले की, आम्ही पुढील कार्यवाही करू. हा बिबट्या गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कासारसाई येथे दिसला होता. आठ दिवसांपूर्वी सांगवडे आणि साळुंम्ब्रे गावच्या शिवारात त्याचे दर्शन झाले होते. आता सोमवार आणि मंगळवार शिरगावात त्याचा वावर असल्याचे प्रत्यक्ष दर्शिनी सांगितले. या परिसरात उस शेती जास्त असल्याने लपून बसण्यासाठी चांगले क्षेत्र आहे. त्यामुळे तो बिबट्याच असावा. या भागात पिंजरा लावण्यासाठी प्रधान वनपरिक्षेत्र अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असून ती मिळताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
लवकरात लवकर पिंजरा लावावा
संत तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालक राजाराम राक्षे यांनी सांगितले की, या बिबट्याने जर कोनाला नुकसान पोचवले तर त्याला सर्वस्वी जबाबदार वनविभाग राहील असे. जर पंधरा दिवस या भागात बिबट्याचा वावर आहे तर कार्यवाही का करत नाहीत? या विभागाचे लोक येतात आणि नुसते पाहून जातात. बाहेर निघु नका म्हणतात. बिबट्याच्या भीतीने आम्ही शेतातील कामे करायची नाहीत का? त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर असून यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी व पिंजरा लावण्यात यावा.