शिरपुरच्या क्रिकेट खेळाडूंनी लुटला ‘आयपीएल’चा आनंद

0

धुळे । शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून शिरपूरचे खेळाडू अतिशय चांगल्या रीतीने घडविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यांच्यात आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी शिरपूरचे खेळाडू व प्रशिक्षक असे एकूण 30 जणांना शिरपूर येथून नवकार या खाजगी ट्रॅव्हल्सने आय.पी.एल. चे सामने मुंबई येथे पाहण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात आली.

मुंबई-पुणे सामन्याचा रोमांच पाहिला
सर्व खेळाडू व कोचेस यांना भुपेशभाई पटेल यांनी सर्व खर्च करुन मुंबई येथील वानखेडे स्टेडीअम येथे मुंबई व पुणे यांच्यातील दि. 16 मे रोजीचा सामना पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली. याबाबत शिरपूर तालुक्यासह इतरत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. सामना पाहण्यासाठी शिरपूरचे क्रिकेट खेळाडू परेश पाटील, राहुल गिरासे, तरुण देवरे, अनिकेत मोरे, उत्कर्ष अग्रवाल, तर्वेश पाटील, लोकेश देशमुख, पियूष पाटील, व्यंकटेश जगदाळे, प्रणव पाटील, हितेश पाटील, प्रियांशू पाटील, सोनू जगताप, ऋषिकेश सोनवणे, रवि विश्वकर्मा, निखील राजपूत, आदित्य कुलकर्णी, आदित्य् अग्रवाल, भुपेश चौधरी, दिपराज ढोले, चेतस्विनी राजपूत, मोनिका पावरा, चेतना जैन, तुषार गुजराथी, नितीन महाजन, कृणाल ठाकूर, संजय जगताप, प्रशिक्षक राकेश बोरसे, संदिप देशमुख, राहुल स्वर्गे असे एकूण 30 जणांना पाठविण्यात आले. या सर्वांनी सामना पाहून आनंद लुटला. शिरपूरच्या खेळाडूंमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने पाहून व खेळाडूंमधील टॅलेंट आत्मसात व्हावे या हेतूने भुपेशभाई पटेल यांनी सर्व खर्च करुन त्यांना मुंबई येथे सामन्याचा आनंद लुटण्यासाठी पाठविले.