शिरपुरच्या पटेल कॅम्पसमधून शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार

0

शिरपूर। आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या 66 विद्यार्थ्यांची मोटिफ इंकॉर्पोरेटेड अहमदाबाद या आय.टी. सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीत कस्टमर सर्विस असोसीएट या पदावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली. सदर कंपनी तर्फे पटेल अभियांत्रिकीत पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 400 विद्यार्थी या कॅम्पस प्रक्रियेत सहभागी झाले होते. मोटीफ इंकॉर्पोरेटेड हि 100 सर्वोत्कृष्ट आउटसौर्सिंग प्रोव्हाडर पैकी एक असुन ग्राहक केंद्रीत व्यवसाय व माहिती प्रक्रियेचे आउटसौर्सिंग इ. कामे सदर कंपनी तर्फे केली जातात.

निवड झालेल्यांचे कौतुक : चार स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला परीक्षा , इंटरनेट टायपिंग ,ऑपरेशन राउंड व शेवटी एच.आर.राउंड झाला. त्यात एकूण 66 विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन यांनी अभिनंदन केले.

यांनी घेतले परिश्रम : संपूर्ण कॅम्पस मुलाखती साठी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. अनिल टाटिया, ट्रैनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर पूजा जसवाणी, रजिस्ट्रार तथा जन संपर्क अधिकारी जितेश जाधव, प्रा. डॉ. एस. एस. चालिकवार. प्रा. डॉ. मोहन कळसकर, प्रा. पंकज जैन, प्रा. उमेश लड्ढा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी प्रा. डॉ. आर. आर. पाटिल, प्रा. पी. जे. चौधरी, प्रा. सी. वि. परदेशी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

फार्मसीच्या 45 विद्यार्थ्यांची निवड !
शिरपुर येथील आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयात अंतिम वर्ष बी.फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी शोध ऍडव्हान्स टेक्नॉलॉजि ग्रुपद्वारे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. शोध ऍडव्हान्स टेक्नॉलॉजि ग्रुप हि एक कन्सल्टन्सी कंपनी असून देशातील सर्वात मोठी रिक्रुटमेंट एजन्सी आहे. सॉफ्ट स्कील डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट, पर्सनल ट्रैनिंग, कॉर्पोरेट ट्रेनिंग अश्या प्रकारच्या सेवा ह्या ग्रुप द्वारे पुरविल्या जातात. नामांकित फार्मा कंपन्यांसाठी हा ग्रुप त्या-त्या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत महाविद्यालयांमध्ये कॅम्पस मुलाखती घेत असतात यां मध्ये अजंता फार्मासुटिकल, रुबीकॉन, हरमन फार्मासुटिकल, इंडिको रेमेडीज, इप्का फार्मास्युटिकल अश्या औषधी उद्योग समूहांचा समावेश आहे.