शिरपुरातील विवाहितेचा सासरी छळ ; गुन्हा दाखल

0

शिरपूर । शहरातील गायत्री कॉलनीत राहणार्‍या 33 वर्षीय विवाहीतेच्या सासरी प्लॉट घेण्यासाठी माहेरी 2 लाख रुपये आणले नाहीत व मुलबाळ होत नाही या कारणावरुन छळ होत असल्याचे तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. शहरातील गायत्री कॉलनीतील रश्मी विशाल पाटील (वय 33) या विवाहीतेचा विवाह अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील विशाल वसंत पाटील यांच्याशी झाला होता. मात्र तिने प्लॉट घेण्यासाठी माहेरुन 2 लाख रुपये आणले नाहीत. व मुलबाळ होत नाही या कारणावरुन नेहमी तिच्या सासरी पती विशाल पाटील, वसंत देविदास पाटील, विजया वसंत पाटील, (दोघे रा.एैरोली) पल्लवी निरंजन चव्हाण (रा. घोडबंदर, जि. ठाणे) या चोघांकडून नेहमीच शारिरीक व मानसिक छळ केला जात होता. याबाबत रश्मी पाटील यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात वरिल चौघांच्या विरोधात दिलेल्या फियादीवरुन भा.द.वी.कलम 498 अ, 406, 324, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवलदार पी.एस.पाटील हे करित आहेत.