शिरपुर। राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या 56 वा वाढदिवसानिमित्त शिरपुर भाजपातर्फे भिक्षुकांना अन्नदान व शाल वाटप भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. शिरपुर येथील पाताळेश्वर मंदीर परिसरातील भिकक्षुकंना अन्नदान व शाल वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले की अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सर्वसामान्य जनतेचे व सामान्य कार्यकर्तेचे नेते असुन कार्यकर्तेंची जाण असलेले सर्वमान्य जाणते नेते असल्याचे नमुद केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी,जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी,जिल्हा चिटणीस संजय आसापुरे,जिल्हा कोषध्यक्ष आबा धाकड,शहराध्यक्ष हेमंत पाटील,शहर सरचिटणीस महेंद्र पाटील,शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी,शहर चिटणीस अविनाश शिंपी,भाजपा वैद्यकिय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ मनोज निकम,अल्पसंख्यक आघाडी जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमराज राजपुत,योगेश भोई,गणेश माळी आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.