शिरपूर। येथील पाटीलवाड्यात दरवर्षाप्रमाणे यंदाही मानाच्या ‘बाबा गणपती’ची स्थापना जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष कै.बाबा पाटील यांनी स्थापन केलेल्या ‘पाटीलवाडा मित्रमंडळा’च्या बाबा गणपतीला सार्वजनिक गणेशोत्सवात ‘मानाचा गणपती’ म्हणून मान मिळवून दिला. जिल्ह्याभरात असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा गणपतीने नावलौकीक संपादन केले आहे. यंदा मंडळाने मूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पेण येथून आकर्षक आणि देखणी मूर्ती आणली आहे. शांत, प्रसन्न आणि पाहताच पावले थबकून जातील, असे भाव मुर्तीच्या चेहर्यांवर आहेत. गणेशमुर्तीकडे पाहिल्यास मूर्ती आपल्याकडे पाहत असल्याची प्रचिती भाविकाला येते. या परिसरातील हनुमानाच्या मंदिरावर गणेशोत्सवासाठी आकर्षक रोषणाई केली आहे.
अशी आहे उत्सव समितीची रचना
मंडळाने नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. त्यात रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी, वृक्षारोपण यासारख्या विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. मंडळाने कार्यकारिणीत परिसरातील सर्व समाजातील व्यक्तींनास्थान दिले आहे. यात उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जय पाटील, उपाध्यक्षपदी प्रमोद बोरसे, प्रशांत शेटे, खजिनदार मनीष मराठे, सौरभ बोरसे, सचिव योगराज जाधव, सहसचिव निलेश धनगर तर कोषाध्यक्ष- गोलू राजपूत यांचा समावेश आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप पाटील, नगरसेवक मनुदादा पाटील, हेमंत पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत पाटील, मनोज शिंपी, रावसाहेब पाटील, नरेश पवार, रोहीत शेटे, सचिन पवार, बंडू बडगुजर, हेमंत बोरसे, चंद्रकांत गुरव, योगेश धोबी, आदींचा समावेश आहे.