शिरपुरात पावसाचे जोरदार आगमन

0

शिरपूर । रविवारी दुपारी दोन वाजता शिरपूर शहरात पावसाला सुरूवात झाल्याने गेल्या अनेक दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना यामुळे काही अंशी दिलासा मिळणार आहे. आकाशाकडे डोळे लावुन बसलेल्या शेतकर्‍याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. पावसामध्ये भिजण्याचा आनंद मनमुराद लुटतांना बाल गोपाल.