शिरपूर । दृष्टीहीन बांधवांचे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता त्यांचेही समाजासाठी मोठे योगदान असल्याचे सिद्ध होते. दृष्टीहीन बंधू भगिनी यांच्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी केले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र विभागीय शाखा, नाशिक व शिरपूरच्या श्री जैन अलर्ट गृप ऑफ इंडिया यांच्या वतीने विविध क्षेत्रात यशस्वीपणे नोकरी व खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या अंध कामगार बंधू भगिनींचा गुणगौरव नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अंध कामगारांचा भेटवस्तू देवून गुणगौरव करण्यात आला. या आगळयावेगळया उपक्रमाने उपस्थितांचे डोळे पाणावले
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी व्यासपीठावर चिंतामण अहिरे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, शिरपूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जैन, सोनगीर येथील दिलीप माळी, शांतीलाल जैन, प्रा.डॉ. रजनी लुंगसे, प्रा.निलीमा पाटील, राजेंद्र जैन, मोतीलाल शर्मा, राधेशाम पंडीत, दृष्टीहीन संघाचे अध्यक्ष संजयराव घोडेराव, अंधशाळेचे सपकाळ सर, प्रकाश गुरव, कैलास धाकड उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजनाची तसेच सर्व दिव्यांग अंध पदाधिकारी, 150 अंध विद्यार्थी मुलेमुली यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केली.
योगदान महत्वाचे
नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते डॉ. हेलन केलर व ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात चिंतामण अहिरे यांनी सर्व दृष्टीहीन बांधवांसाठी राष्ट्रीय अंध दिन, पांढरी काठी, विविध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच समाजात अंध व्यक्तींचेही प्रत्येक क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे सांगितले. यावेळी शिरपूर येथील राजेंद्र जैन व जैन समाज बांधवांकडून 150 अंध मुलामुलींना जेवणाचे डबे वाटप करण्यात आले. तसेच 15 हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली. आभार गुणवंत पिंगळे यांनी मानले. ऋतूजा बोरसे हिने बेटी बचाओ याबाबत एकांकिका सादर केली. यशस्वीतेसाठी उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल गुणवंत पिंगळे, राजेंद्र सोनवणे, अतिश गावित, सचिन भदाणे, विनोद गवांडे, माया अहिरे, आशा महाजन, पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परीश्रम घेतले.