शिरपूर । शिरपूर निमझरी रस्त्यावर होमिओपॅथिक महाविद्यालयापुढे रविवार 12 रोजी सायंकाळी पाच वाजता या अनोळखी युवकाचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान निळी पॅन्ट, पांढरा शर्ट घातलेला साधारण 30 ते 35 वर्षाच्या युवकाचा मृतदेह असून कोणी अज्ञात व्यक्तींनी त्याला दुसरीकडे मारून रस्त्यावर टाकून दिल्याचे पोलिसांकडून समजले आहे. मयताच्या हातावर, पाठीवर मारल्याचा खुणा असल्याचे घटनास्थलावरून पोलिसांनी पाहणी केल्या वरून सांगितले. यावेळी घटनास्थळी पीएसआय किरण बर्वे, अकिल पठाण, हवालदार नारायण पाटील होते.