शिरपूर। शहरातील क्रांतीनगरात देशी बनावटीचा कट्टा बाळगतांना पोलिसांनी एकास रंगेहाथ पकडले. तर विक्री करणारा मात्र पलायन करण्यात यशस्वी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघा संशयितां विरूध्द शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शिरपूर शहरचे पोकॉ.प्रविण वसंत अमृतकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.45 वाजेच्या सुमारास क्रांतीनगरातील न्यु भारत सर्व्हिस सेंटरजवळ महेंद्र राजपुत हा विनापरवाना लोखंडी देशी बनावटीचा सुमारे 10 हजार रूपये किंमतीचा कट्टा स्वतःकडे बाळगून त्याठिकाणी फिरतांना आढळून आला. याबाबत त्याची चौकशी केली असता त्याने अवैध पिस्तुल बाळगणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात चार दिवसांपूर्वी अर्जुन राजू बेंडवाल रा.कुटीर रुग्णालयाजवळ,शिरपूर याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत संशयित महेंद्र ऊर्फ आप्पा भगवानसिंग राजपूत रा.क्रांतीनगर,शिरपूर याला कट्ट्यासह ताब्यात घेतले असून राजू बेंडवाल हा मात्र फरार झाला. संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.